मुख्य बातमी
रत्नागिरी आकाशवाणीवर पालकमंत्री उदय सामंत यांची विशेष मुलाखत

रत्नागिरी : रत्नागिरी आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम प्रमुख सुहास विद्वांस यांनी शुक्रवारी घेतलेल्या विशेष मुलाखतीत राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासावर मनमोकळा संवाद साधला.

या मुलाखतीत त्यांनी रत्नागिरीत वाढणाऱ्या पर्यटनाच्या संधी, येणारे उद्योगधंदे आणि त्याचा जिल्ह्याच्या प्रगतीवर होणारा प्रभाव, भविष्यातील कायापालटाची दिशा या आणि अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आमदार सामंत यांनी सविस्तर माहिती दिली.
रत्नागिरीच्या उज्ज्वल भविष्याची चाहूल या मुलाखतीतून नक्की ऐकायला मिळेल, असा विश्वास पालकमंत्री सामंत यांनी व्यक्त केला.



