मुख्य बातमी

ॲड. विलास पाटणे यांच्या न्यायिक धैर्याचा दीपस्तंभ ‘न्या. एच आर खन्ना’ पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा 

रत्नागिरी : ज्येष्ठ लेखक अ‍ॅड. विलास पाटणे यांच्या न्यायिक धैर्याचा दीपस्तंभ ‘न्या. एच आर खन्ना’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज (१९ एप्रिल) सायंकाळी ५.३० वाजता हॉटेल विवेक हॉल येथे संपन्न होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एच आर खन्ना हे त्यांच्या प्रामाणिकपणा, धैर्यासाठी आणि विशेषतः ‘एमडीएम’ जबलापूर ‘ प्रकरणातील निकालासाठी ओळखले जातात. केशवानंद खटल्यातील निकालाने त्यानी भारतीय लोकशाहीचे संरक्षण केले. न्या. खन्ना मूलभूत हक्कांचा संरक्षणासाठी आणि राज्यघटनेच्या पवित्र्यासाठी त्यानी केलेल्या संघर्षासाठी ओळखले जातात. ऐतिहासिक निकालामुळे त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद गमवावे लागले.

न्यायाधीश अभय ओक यांनी या पुस्तकाला सुंदर प्रस्तावना लिहिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळे या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. न्या वराळे १४ वर्ष मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. अभासुवृत्ती, अफाट वाचन आणि न्यायालयीन शिस्तीकरिता ते ओळखले जातात. उत्तम वक्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. आंबेडकरी विधी महाविद्यालयात प्राध्यापक त्यांनी काम केले आहे. याचबरोबर न्या. मकरंद कर्णिक, न्या. माधव जामदार आणि प्रधान जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!