रत्नागिरीमधील जागृत मोटर्स मनसे कामगार युनियनची स्थापना

रत्नागिरी : येथील मारुती कंपनीचे अधिकृत विक्रेते जागृत मोटर्स प्रा.लि. येथील अनेक कामगारांनी मनसे कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारले. त्याचा फलक अनावरण महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना उपाध्यक्ष वैभव शेट्ये यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कामगार सेना चिटणीस गणेश खंदारे, चिटणीस मनोज रामाराजे, मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, शहर अध्यक्ष बाबय भाटकर, शहर सचिव प्रभात सुर्वे उपस्थित होते. त्यानंतर द्वार सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते.
फालकाचे अनावरण झाल्यावर द्वार सभेमध्ये मार्गदर्शन करताना वैभव शेट्ये यांनी कामगारांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात मनसे नक्कीच आवाज उठवणार व न्याय मिळवून देणार असे सांगितले.
त्यानंतर मनसेच्या शिष्ट मंडळाने कंपनी मॅनेजमेंटची भेट घेऊन कामगारांच्या बाजूने अनेक गोष्टी मांडल्या. त्यावर आगामी काही दिवसांत ठोस उपाययोजना न झाल्यास कामगार सेना आणि मॅनेजमेंट यांचा कायदेशीर संघर्ष अटळ असेल, असे देखील यावेळी ठणकावून सांगण्यात आले.
या वेळी उपतालुकाध्यक्ष रूपेश चव्हाण, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष खाडे, गौरव चव्हाण, चैतन्य शेंडे, शुभम नागावेकर, महिला आघाडी शहर अध्यक्ष सुश्मिता सुर्वे, संपदा राणा, बिस्मिल्लाह नदाफ, काजल गोसावी, नंदिनी गोसावी, कामगार सेनेसोबत मनसे महिला आघाडी व इतर कार्यकारिणीची उपस्थिती लक्षणीय होती.


