मुख्य बातमी

भाजप पदवीधर सेलतर्फे शिक्षकांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे व भाजप पदवीधर सेल रत्नागिरी जिल्ह्यातर्फे शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पदवीधर सेलचे जिल्हा संयोजक मनोज पाटणकर यांनी दिली.

निबंधाचा विषय एआय तंत्रज्ञानाचा शिक्षण पद्धतीत वापर असा आहे. यासाठी माध्यम मराठी असून शब्दमर्यादा १००० शब्द आहे. या स्पर्धेत शाळा व कनिष्ठ महाविद्यालय कार्यरत शिक्षक सहभागी होऊ शकतात. निबंध स्वहस्ताक्षरात लिहिणे आवश्यक असून निबंधाचे लिखाण कागदाच्या एका बाजूला असणे आवश्यक आहे. स्पर्धकाने नाव, पत्ता, मोबाईल नं. शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव ही माहिती स्वतंत्र कागदावर लिहून निबंधासोबत जोडावी. निबंध १५ मेपर्यंत रत्नागिरी भाजप जिल्हा कार्यालय/तालुका कार्यालय येथे हाती पोहोच करावेत.

स्पर्धेतील प्रथम विजेत्याला ५ हजार द्वितीय क्रमांकाला ३ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला २ हजार रुपये रोख आणि प्रत्येकी सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक तसेच उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी १ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व शिक्षकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धा संयोजकांचा निर्णय अंतिम राहिल. स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण समारंभ याबाबतची माहिती नंतर जाहीर करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी पदवीधर सेलचे जिल्हा संयोजक मनोज पाटणकर (7021034960), जिल्हा सहसंयोजक शेखर लेले (9960854073) आणि जिल्हा सहसंयोजक अमोल भोबस्कर (9130336363) यांच्याशी संपर्क साधावा.

जास्तीत जास्त शिक्षकांनी यात भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष भाजपा (दक्षिण) प्रशांत यादव जिल्हाध्यक्ष भाजपा (उत्तर) सतीश मोरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!