मुख्य बातमी

पालकमंत्री डॉ. उदय सामंत आज रत्नागिरी दौऱ्यावर

रत्नागिरी : राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवारी (२६ एप्रिल) दुपारी १२.१५ वाजता हेलिकॉप्टरने चंपक मैदान हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. दुपारी १२.३० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक आगमन व राखीव. दुपारी १ वाजता मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत तीर्थक्षेत्र अयोध्या येथे जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती. (स्थळ : रत्नागिरी रेल्वे स्थानक) दुपारी १.३० वाजता चंपक मैदान हेलिपॅड, रत्नागिरी येथून हेलिकॉप्टरने पालघरकडे प्रयाण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!