महाराष्ट्रमुख्य बातमी

रायगडाची छोटी हिरकणी शर्विका म्हात्रे हिचा दिल्लीच्या आग्रा किल्ल्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान

अलिबाग (राजेश बाष्टे) : राज्यभरामध्ये शिवजयंतीचा जल्लोष सुरू असताना रायगड जिल्ह्यासाठी आणि अलिबाग तालुक्यासाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. अलिबागची कन्या आणि महाराष्ट्राची छोटी हिरकणी म्हणून ओळख असलेली शर्विका म्हात्रे हिचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आग्रा किल्ल्यावर सन्मान करण्यात आला.

शर्विकाने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील तब्बल १६५ दुर्ग सर केले असून सध्या ती पुणे येथे वॉल क्लाइंबिंग या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. तिच्या या कार्यामुळे तिला आत्तापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून विविध रेकॉर्ड बुक मध्ये तिची नोंद यापूर्वीच झालेली आहे.

छत्रपती संभाजी नगरचे विनोद पाटील हे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर.आर. फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गेली काही वर्षे दिल्लीच्या आग्रा किल्ल्यावर शिवजयंती साजरी करत आहेत. त्या निमित्ताने देशभरातून असंख्य शिवभक्त या सोहळ्यासाठी उपस्थित राहत असतात. ज्या ठिकाणी हिंदूनृसिंह छत्रपती शिवाजी महाराज यांनी क्रूरकर्मा औरंगजेबासमोर रणगर्जना केली, ज्या ठिकाणाहून संपूर्ण जगाला शिवप्रतापाचे दर्शन घडले, जिथून शिवरायांनी गरुडझेप घेतली,

त्याच आग्रा किल्ल्याच्या प्रांगणात शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्याची सुरुवात आपल्या सरकारने केली. हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार, उत्तर प्रदेशचे मंत्री योगेंद्र उपाध्याय, अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

रायगडाच्या लेकीने अवघ्या आठव्या वर्षातच आपल्या कामगिरीने जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नाव देशभरात नेले आहे. त्यामुळेच देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!