मुख्य बातमीसामाजिक

समर्थ इन्वेस्टमेंट्सतर्फे ४ मे रोजी ‘समर्थ रत्न पुरस्कारा’चे वितरण

रत्नागिरी : समर्थ इन्वेस्टमेंट्स या रत्नागिरीमधील वित्तीय संस्थेतर्फे आज (४ मे) संध्याकाळी ५.३० वाजता मारुती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये एका दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ‘समर्थ रत्न पुरस्कार’ वितरीत केले जाणार असून, कार्यक्रमादरम्यान सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री हे रत्नागिरीकरांशी संवाद साधणार आहेत.

आपला समाज अधिक मूल्याधिष्ठित व सुसंस्कारी व्हावा ह्यासाठी समाजाच्या विविध क्षेत्रातील अविरत सक्रिय असणाऱ्या अशा समाजव्रर्तींना, या निमित्ताने  समर्थरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा बहुवीध क्षेत्रामधील राजेश आयरे, वीणा लेले, वल्लभ वणजू, उमा देवळे, सुनील बेंडखळे, डॉ. आदित्य मुकादम आदी समाजव्रतींना ह्या सन्मान सोहळ्यात ‘समर्थ रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रत्नागिरीमधील सुविख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष बेडेकर व ज्येष्ठ समाजव्रती व उद्योजक श्री. धरमसीभाई हिरजीभाई चौहान ह्यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहेत. सन्मानचिन्ह, उपरणे, रोख रुपये ५००१/- असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

सन्मान सोहळा अधिक रंजक व संस्मरणीय व्हावा यासाठी प्रथमच सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते पुष्कर श्रोत्री हे रत्नागिरीकरांसोबत गप्पा मारण्यासाठी येणार आहेत. आपल्या अष्टपैलू अभिनयाने रंगभूमी, छोटा पडदा, मोठा पडदा संपन्न करणाऱ्या पुष्कर यांच्याशी अभिनेत्री योगिनी पोफळे या मुक्त संवाद साधतील. पुष्करसोबत गप्पा, किस्से, अभिनय छटा अनुभवीताना रसिक मंत्रमुग्ध होऊन जातील यात शंका नाही.

या सन्मान सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य असून त्यासंदर्भातील प्रवेशिका रसिकांना ‘समर्थ इन्व्हेस्टमेंट्स’ च्या रत्नागिरी शाखेमध्ये म्हणजेच दुकान क्रमांक ५, सुहास प्लाझा, पारसे स्केयर कॉलनी, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथून सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत प्राप्त होणार असून समर्थ च्या प्रिया थेटे व अनिरुद्ध थेटे ह्यांना अनुक्रमे ९९२२४१६०७६ व ९१५८८७०८२० ह्या क्रमांकावर संपर्क साधून आरक्षित करता येणार आहेत. संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन वैशाली वैशंपायन-पोतदार करणार असून अभिजित सरदेसाई यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!