मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

देवरुखमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी १ कोटी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

बावनदीवर धरण बंधारा बांधकामाचे भूमिपूजन

देवरुख : शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एक कोटी रुपये देण्याची घोषणा करतानाच, संगमेश्वर तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभलाय. छत्रपती संभाजी महाराजांचं जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

देवरुख नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बाव नदीवर धरण बंधारा बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, “देवरुख शहरातील प्रत्येक नागरिकाला पाणी मिळालं पाहिजे, असं नियोजन नगरपंचायत प्रशासनानं केलंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या ९ ते १४ वयोगटातील मुलींना कर्करोग होऊ नये म्हणून ५० हजार मुलींना मोफत लस देण्याचा निर्णय घेतलाय. असा निर्णय घेणारा रत्नागिरी हा देशातील पहिला जिल्हा आहे.”

यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता गणेश सलगर, तहसीलदार अमृता साबळे, मुख्याधिकारी श्री. विसपुते, राहुल पंडित, जि.प. चे माजी अध्यक्ष रोहन बने, माजी सभापती बाबूजी म्हाप, देवरुख नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, दोन्ही गावचे सरपंच, सचिन मांगले, हनिफ हरचिरकर, नगरसेवक प्रफुल भुवड, वैभव पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!