मुख्य बातमीशैक्षणिक

अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययनासाठी शिष्यवृत्तीसाठी २० मेपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून जाहिरातीद्वारे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल अशी होती. यासाठी समाज कल्याण आयुक्तालयाकडून २० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.

अधिक माहितीसाठी शासनाचे संकेतस्थळ “www.maharashtra.gov.in” येथील “रोजगार” या लिंकवर भेट देऊन अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!