क्रीडामुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

टेरव येथे ८ मेपासून कबड्डी स्पर्धेचे आयोजन

चिपळूण : तालुक्यातील टेरव येथे श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त राधाकृष्ण साधनालय संघ पुरस्कृत, राधाकृष्ण क्रीडा मंडळ यांच्या वतीने ८ मे ते १० मे या कालावधीत (कै.) बाबुराव दादाजीराव कदम क्रीडा नगरीत राधाकृष्ण मंदिरासमोर भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ग्रामीण कबड्डी विकास संघटना, चिपळूण या संस्थेच्या मान्यतेने घेण्यात येत असून एकूण २० संघ भाग घेणार आहेत.

स्पर्धेत घसघशीत रोख पारितोषिके व आकर्षक चषक भेट देण्यात येणार आहेत. अंतिम विजयी संघास कै. वसंतराव अमृतराव कदम यांच्या स्मरणार्थ अजित वसंतराव कदम यांजकडून रोख रुपये १० हजार व आकर्षक चषक, तर अंतिम उपविजयी संघास कै. सौरभ सुहासराव कदम (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) यांजकडून रोख रुपये ७ हजार ५०० व आकर्षक चषक दिला जाणार आहे. तसेच (कै.) रघुनाथ नारायणराव कदम यांच्या स्मरणार्थ अशोक रघुनाथराव कदम व (कै.) महादेवराव कृष्णाजीराव यांच्या स्मरणार्थ नीलेश महादेवराव कदम यांच्याकडून दोन्ही उपांत्य विजयी संघास प्रत्येकी ५ हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.

त्याचप्रमाणे उत्कृष्ट चढाईसाठी (कै.) अनंतराव सखारामराव मोर यांच्या स्मरणार्थ प्रशांत अनंतराव मोरे आणि बंधू, उत्कृष्ट पकडीसाठी (कै.) सौ. वनमाला मानसिंगराव कदम यांच्या स्मरणार्थ स्वप्नील मानसिंगराव कदम, सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी (कै.) दीपकराव दिनकरराव कदम यांच्या स्मरणार्थ विनय दीपकराव कदम, तर शिस्तबद्ध संघास (कै.) राधेश्याम पांडुरंगराव कदम यांच्या स्मरणार्थ रूपेश राधेश्यामराव कदम यांच्या वतीने आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच मान्यवरांसाठी २५ सन्मानचिन्हे (कै.) सौ. वनमाला मानसिंगराव कदम यांच्या स्मरणार्थ मानसिंगराव बाबुराव कदम यांनी प्रायोजित केली आहेत.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वाडीतील सर्व अबाल वृद्ध झटत आहेत. सर्व तरुणांनी तसेच वाडीतील अनेक मान्यवरांनी यथाशक्ती अर्थिक सहकार्य करून संस्थेस उपकृत केले आहे. संघाच्या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी गेली ५० वर्षे कैलासवासी हणमंतराव, कशीरामराव, उद्धवराव, वसंतराव, दत्तारामराव, पर्वतराव, पांडुरंगराव, दत्तात्रयराव, सखारामराव, भाऊराव, जगन्नाथराव, बाबुराव या व इतर अनेक सद्गृहस्थांनी अपार कष्ट घेतले आहेत. सध्या राधाकृष्ण साधनालय संघाचे कार्य पुढे नेण्याचे काम सर्वश्री धोंडजीराव, रघुनाथराव, दशरथराव, मानसिंगराव, बजाजीराव, संभाजीराव, भाऊराव, विश्वासराव अशोकराव, गोपीचंदराव, जिजाजी घडशी, वासुदेव सुतार व शहरातील व वाडीतील सर्व लहान थोर ग्रामस्थ व तरुण वर्ग एकत्रितपणे करत आहेत. राधाकृष्ण मंदिरात, वाडीत होणारे सर्व उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदान एकत्र पणे साजरे केले जात आहेत.

कबड्डी स्पर्धेस येणाऱ्या अंदाजे १ लाख ५० हजारांचा खर्च वाडीतील सर्व लहान थोर मंडळींनी सढळहस्ते सहकार्य करत उचलला आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिरीष पांडुरंगराव कदम, ओंकार (बाबू) अशोकराव कदम, प्रशांत अनंतराव मोरे, विनय दीपकराव कदम, ओम अविनाशराव कदम यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!