मुख्य बातमी

पालकमंत्री डॉ. उदय सामंत उद्या जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत ११ मे रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवारी (११ मे) पहाटे ३.२० वाजता कोंकणकन्या एक्सप्रेसने (गाडी नं.२०१११) चिपळूण रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, चिपळूण कडे प्रयाण. पहाटे ३.३० वाजता शासकीय विश्रामगृह, चिपळूण येथे आगमन व राखीव. सकाळी ९.३० वाजता चि. निहार कोवळे यांच्या शुभ विवाह प्रित्यर्थ भेट (स्थळ : हाऊस नंबर २५२/२५३ राजगृह, वडनाका एकवीरा मंदिराजवळ चिपळूण) सकाळी ९.४५ वाजता मोटारीने मांडकी पालवण चिपळूणकडे प्रयाण. सकाळी १०.३० वाजता चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटल च्या उद्घाटनास उपस्थिती (स्थळ : मांडकी पालवण ता. चिपळूण जि. रत्नागिरी). सकाळी ११ वाजता मांडकी पालवण ता.चिपळूण कडे प्रयाण. सकाळी ११.४५ वाजता रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालय उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण, जि.रत्नागिरी). दुपारी १२.३० वाजता चिपळूण येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी २ वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सायंकाळी ५ वाजता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण येथे भेट व पाहणी (स्थळ : तारांगण, रत्नागिरी) सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विशेष निधीतून म.रा.मा.प. मंडळाच्या रत्नागिरी येथील मुख्य बस स्थानकाच्या नूतन इमारतीचा लाकार्पण सोहळा (स्थळ : मध्यवर्ती बसस्थानक, रत्नागिरी) सायंकाळी ७.०० वाजता रत्नदुर्ग शिवसृष्टी येथे भेट व पाहणी (स्थळ : रत्नदुर्ग किल्ला, रत्नागिरी) सायंकाळी ७.३० वाजता कृषि तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषि विकास परिषद, रत्नागिरी : पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या सन्मान समारंभास उपस्थिती (स्थळ : स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल, आठवडा बाजार, रत्नागिरी) रात्रौ ८.३० वाजता रत्नागिरी येथून मोटारीने पाली, ता. जि. रत्नागिरी कडे प्रयाण. रात्रौ ९.०० वाजता पाली निवासस्थान ता.जि. रत्नागिरी येथे आगमन व राखीव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!