मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
शिवसेनेतर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात

आबलोली (संदेश कदम) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विक्रांत भास्कर जाधव यांच्या वाढदिवसाचे आणि पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकला उद्योग समूह मैदान येथे भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, गुहागरच्या माजी सभापती पूर्वी निमुणकर, विभाग प्रमुख रवींद्र आंबेकर, शाखाप्रमुख तृषांत सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पालशेतकर, वसंत सागवेकर, श्री. साळवी, उदय कदम, विशाल लोकरे, शैलेश दिंडे आदी मान्यवर उपस्थित होते.



