दहावी परीक्षेत मुग्धा लिंगायत ९१.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (पुणे) यांच्या वतीने फेब्रुवारी २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी निकाल जाहीर झाला असून, या परीक्षेत मुग्धा संतोष लिंगायत हिने ९१.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. मुग्धा लिंगायत ही रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. तिला वडील संतोष आणि आई निशा लिंगायत यांच्यासह शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, तसेच पर्यवेक्षक अमर लवंदे व श्रीमती कल्पना शिरोळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उत्तम निकाल साध्य केला.
संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, कार्याध्यक्षा श्रीमती नमिता कीर आणि कार्यवाह सुनील वणजु यांनी निकालाबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे व चंद्रकांत घवाळी तसेच संस्थेचे सहकार्यवाह संजय जोशी यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
भारत शिक्षण मंडळ व पटवर्धन प्रशालेमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. हा दिमाखदार निकाल हे या संस्थेतील शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांचे समर्पण व पालकांचे आशीर्वाद व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फलित आहे.



