मुख्य बातमी

दी मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेची दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधित 

सैतवडे केंद्रात 'मॉडेल'ची तन्वी बळकटे प्रथम

रत्नागिरी : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी सैतवडे संचलित दी मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या प्रशालेने गेली अनेक वर्षे शंकर टक्के निकालाची परंपरा अबाधित राखली आहे.

या विद्यालयातील तन्वी बळकटे हिने प्रशालेत व केंद्रात प्रथम ८७.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच रिया पावसकर ही ८१.६० टक्के मिळवून द्वितीय, तर सागर केसरकर ८१.४० टक्के गुण मिळवून तृतीय आला. विद्यालयात संख्यात्मक व गुणात्मक दर्जेदार निकाल लागताच सर्व संस्था पदाधिकारी, तसेच मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!