भरत डिंगणकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २१ मे रोजी प्रेरणा दिवस कार्यक्रमाचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील कोळवळी पंचक्रोशीचे नेते दिवंगत एस. डी. पवार यांचे मानसपुत्र आणि आध्यात्मिक क्षेत्रात दीपस्तंभासारखे काम करणारे, स्व-कर्तृत्ववाने सुपरिचित झालेले गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा गावचे सुपुत्र व सामाजिक क्षेत्राबरोबरच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे भरत डिंगणकर यांचे १५ मे रोजी आकस्मित निधन झाले. त्यांचा प्रेरणा दिवस कार्यक्रम उद्या (२१ मे) सायंकाळी ६.३० ते रात्री ९ या वेळेत होणार आहे.
हा कार्यक्रम संत निरंकारी सत्संग भवन, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ऑफ हनुमान रोड, विलेपार्ले (पूर्व) मुंबई – ४०००५७ येथे आयोजित केला आहे. डिंगणकर यांच्या पश्चात पत्नी सुगंधा, मुलगे समीर, स्वप्नील, बहीण व भाऊ शरद असा परिवार आहे. भरत डिंगणकर यांच्या महान कार्यातून प्रेरणा घेण्यासाठी व त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महात्माचे हितचिंतक, आप्तेष्ट, मित्र मंडळी व नातेवाईक यांनी या कार्यक्रमाला वेळेत उपस्थित रहावे, असे जाहीर आवाहन डिंगणकर परिवाराच्या वतीने शरद डिंगणकर यांनी केले आहे.



