
रत्नागिरी : जिल्ह्यात कालपासून मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला असून, आज दिवसभरात ४४.१७ मिमी, तर एकूण ३९७.५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात (७४ मिमी) झाला असून, त्यापाठोपाठ संगमेश्वर (६०.७५ मिमी), राजापूर (४४.६२ मिमी), खेड (४३.४२ मिमी), लांजा (३८.८० मिमी), गुहागर (३८.२० मिमी), दापोली (३४.८५ मिमी), चिपळूण (३३.८८ मिमी), मंडणगड (२९.०० मिमी) या तालुक्यात पाऊस झाला आहे.



