क्रीडामुख्य बातमी

जी. एच. रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा दिमाखात संपन्न

नऊ वर्षांखालील गटात विहंग सावंत, तर पंधरा वर्षांखालील गटात अर्णव चव्हाण व सई प्रभुदेसाई विजेते

रत्नागिरी : जी. एच. रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा २०२५-२६ रा.भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात दि. १७ व १८ रोजी रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित केल्या होत्या. या स्पर्धांना रायसोनी फौंडेशनतर्फे विशेष सहकार्य लाभले होते. विविध वयोगटांतील खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग, प्रगल्भ खेळी आणि उत्कृष्ट आयोजनामुळे यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत विविध गटांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना रोख पारितोषिके आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. ९ वर्षांखालील गटातून दोन मुले व १५ वर्षे वयोगटातून ४ खेळाडूंची निवड महाराष्ट्र राज्य निवड स्पर्धेसाठी करण्यात आली. निवड झालेले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.

नऊ वर्षे वयोगटातील विजेता खेळाडू विहंग सावंत

दि. १७ रोजी ९ व १५ वर्षांखालील गटांच्या निवड स्पर्धा खेळवण्यात आल्या. या स्पर्धांच्या बक्षीस समारंभाला जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष शिरधनकर व चेसमेन रत्नागिरीचे सचिव व ज्येष्ठ बुद्धिबळपटू सुहास कामतेकर उपस्थित होते. श्री. कामतेकर यांनी खेळाडूंना निकालाकडे लक्ष न देता खेळाचा जास्तीत जास्त आनंद घेण्याचा सल्ला दिला आणि त्यातूनच उत्तम निकाल येत जातील, असे सांगितले.

१५ वर्षे वयोगटातील विजेता अर्णव चव्हाण

मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. नऊ वर्षाखालील गट : प्रथम क्रमांक – विहंग सावंत, द्वितीय क्रमांक – पारस मुंडेकर; उत्तेजनार्थ बक्षिसे – अर्णव गावखडकर, रजत जोगळेकर

पंधरा वर्षांखालील गट : प्रथम क्रमांक – अर्णव चव्हाण ; द्वितीय क्रमांक – आर्यन धुळप, तृतीय क्रमांक – आयुष रायकर, चतुर्थ क्रमांक – निधी मुळे; उत्तेजनार्थ : राघव पाध्ये, ओम तेरसे, रु‍मिन वस्ता.

महिला गटाच्या स्पर्धेची विजेती सई प्रभुदेसाई

पंधरा वर्षांखालील मुली : प्रथम क्रमांक – सई प्रभुदेसाई, द्वितीय क्रमांक – सानवी दामले, तृतीय क्रमांक – तनया आंब्रे, चतुर्थ क्रमांक – आर्या पळसुलेदेसाई; उत्तेजनार्थ : मृण्मयी दांडेकर, साची चाळके

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!