मुख्य बातमी

आंबा घाटातून मर्यादित बस सेवा आजपासून सुरू

रत्नागिरी : आंबा घाटातील रस्त्यांना पडलेल्या भेगांमुळे सुरक्षेचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेली वाहतूक आता रत्नागिरी परिवहन विभाग अंतर्गत पुन्हा पूर्ववत करण्यात येत आहे, त्यासाठी प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि आमदार किरण सामंत यांच्या समवेत बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

आंबा घाटातून ही वाहतूक आता ठरवून दिलेल्या स्पीड लिमिटनुसार सोडली जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रत्नागिरी आणि देवरुख आगारातून विविध महत्त्वाच्या मार्गांवर एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत.

प्रशासनाचे वाहतूक अधिकारी सचिन सुर्वे आणि रत्नागिरी विभाग नियंत्रक जानराव यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ही बससेवा सुरळीत करण्यात आली असून प्रवाशांना प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी उद्या प्रशासनाचे स्पॉट अधिकारी म्हणून सहाय्यक वाहतूक निरीक्षक गणेशकुमार वायदंडे हे घटनास्थळी किंवा संबंधित ठिकाणी हजर राहणार आहेत.

आंबा घाटातील वाहतूक सुरळीत झाल्यामुळे कोकणातून कोल्हापूर किंवा इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. प्रशासनाने प्रवाशांना नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.हा महत्त्वपूर्ण लोक निर्णय घेतल्यामुळे रत्नागिरी परिवहन विभागाच्या निर्णयाचे सगळीकडून स्वागत होत आहे.

सोडल्या जाणाऱ्या बसेसची माहिती –

सकाळी ०७:३० वाजता: रत्नागिरी – अंबाजोगाई

सकाळी ०८:१५ वाजता: रत्नागिरी – तुळजापूर

सकाळी ११:०० वाजता: रत्नागिरी – स्वारगेट

सकाळी ०७:१५ वाजता: देवरुख – लातूर

सकाळी ०८:३० वाजता: संगमेश्वर – अक्कलकोट

सायंकाळी ०३:०० वाजता: मार्लेश्वर – सांगली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!