आरोग्यमुख्य बातमी

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनद्वारे होणार कर्करोग निदान

रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी आणि कर्करोगाचे लवकर निदान सुलभ करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागामार्फत अत्याधुनिक कर्करोग निदान व्हॅन (फिरते रुग्णालय) २६ मेपासून वेळापत्रकाप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कार्यरत होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.

या उपक्रमाचा उद्देश रत्नागिरीतील रहिवाशांपर्यंत, विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत, महत्त्वपूर्ण तपासणी सेवा पोहोचवणे हा आहे. यामुळे वेळेवर निदानात सुधारणा होईल आणि संभाव्यतः अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल. ही व्हॅन सामान्य कर्करोगांच्या तपासणीसाठी सुसज्ज आहे, ज्यात सुरुवातीला डिजिटल मशीन वापरून स्तनाच्या तपासण्या आणि कॉल्पोस्कोप वापरून गर्भाशयाच्या मुखाच्या तपासण्या यावर लक्ष केंद्रित केले जाईल.कारण कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात लवकर निदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

मे. मिडिऑन हेल्थकेलेअर यांच्याकडून कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन प्राप्त झाली असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मे व जून २०२५ मध्ये गावभेटीतून व्हॅनमध्ये मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करून कर्करोगाचे निदान केले जाणार आहे.

या कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन सोबत रत्नागिरी जिल्ह्यातील गावभेटीकरीता दंत शल्य चिकित्सक, स्त्री रोग तज्ञ यांची नियुक्ती केली आहे. तसेच तालुका स्तरावरील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही व्हॅन ज्या तालुक्यामध्ये सेवा देईल त्या तालुक्यामधील एन.सी.डी. स्टाफ नर्स, एन.सी.डी. कौन्सिलर,आरोग्य सहाय्यक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, सपोर्ट स्टाफ व शिपाई अशी टीम सदैव व्हॅनसोबत कार्यरत असणार आहे.

या ठिकाणी कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन कर्करोग तपासणीसाठी जाणार आहे अशा ठिकाणी आशा स्वयंसेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत व्यापक प्रमाणात प्रसिध्दी करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. याकामी सबंधित ग्रामपंचायतीनी सहकार्य करावे व या मौल्यवान संधीचा मोफत लाभ घेऊन ३० वर्षांवरील सर्व नागरिकांनी मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

सोबत संस्थानिहाय कर्करोग तपासणी वेळापत्रक जोडले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!