आमदार किरण सामंत यांनी पाली नं. १ शाळेला सदिच्छा भेट

रत्नागिरी : लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी पाली नं.१ शाळेला नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा रत्नागिरी समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्याबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या या शाळेतील हर्ष महेश धाडवे (इ. सहावी) आणि यश महेश डोंगरे (इ. सातवी) या दोन विद्यार्थ्यांचा सत्कार करून गौरविण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे, उपाध्यक्ष प्रार्थना ठीक, विद्यार्थी सुरक्षा समितीचे सदस्य अॅड. सागर पाखरे, मनीषा करळकर, जान्हवी पांचाळ, स्नेहा शिंदे, विनायक राऊत, संतोष पांचाळ उपस्थित होते.
यावेळी आमदार सामंत यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले. तसेच माझी मातृशाळा आहे, तसेच शालेय अनेक गरजांची पूर्तता करण्याचे अभिवचन दिले. शाळा एक नंबर बनवूया शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक, क्रीडा विषय आणि सर्वांगीण दृष्टीने एक नंबरचे बनवण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत आणि या प्रयत्नांना सर्व विद्यार्थी आणि विशेषतः पालकांनी भरभरून सहकार्य करावे, असे आवाहन केले.
जि.प.रत्नागिरी अंतर्गत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांचा राज्याबाहेर अभ्यास दौरा केरळ अनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर, राजा रवीवर्मा आर्ट गॅलरी, पद्मनाभ स्वामी मंदिर त्रिवेंद्रम, कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक, गांधी मंडपम, त्रिवेणी संगम येथे भेट देणार आहेत.
यावेळी पाली नं.१ शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन मोहिते, शिक्षक मारुती घोरपडे, श्रद्धा रसाळ, नेहा जाधव, श्रुती वारंग उपस्थित होते.


