मुख्य बातमी
रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेसाठी अतिमहत्त्वाची सूचना

रत्नागिरी : भारतीय हवामान विभागाकडून दिनांक २२ मे रोजीच्या अंदाजानुसार दिनांक २२ ते २६ मे दरम्यान जिल्ह्यात किनारी भागात आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसाह मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.
दिनांक २२ ते २६ मे दरम्यान ४५-५० किमी प्रतितास ते ५५ किमी प्रतितास या वेगाने वारे वाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दि. २३ मे रोजी रात्रीपर्यंत समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. २४ मे ते २६ मे दरम्यान अति खवळलेला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना इशारा देण्यात येत आहे की त्यांनी समुद्रात जाऊ नये. आणि जे गेले आहेत त्यांनी किनाऱ्यावर २३ तारखेला परत यावे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी तर्फे जनहितार्थ



