कोतवडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईच्या वतीने सत्कार

रत्नागिरी : कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित श्री. वि. प. कोतवडे इंग्लिश स्कूल कोतवडेच्या इयत्ता दहावीच्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांचा कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मंडळाचे उपाध्यक्ष संजय मयेकर, कार्यवाह संजय कोलगे, शाळा समिती अध्यक्ष नरेश कांबळे, संस्था सदस्य प्रकाश ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम आलेली राणी अनिल रांबाडे (९० टक्के), द्वितीय आयुषी दीपक माटल (८८.४०), तृतीय अथर्व पुरुषोत्तम मोहित (८७), चौथा आयुष अनंत घवाळी (८६) आणि पाचवा आलेला आराध्य दर्शन ठोंबरे (८५.२०) यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार, ज्येष्ठ शिक्षिका शिल्पा सुर्वे, शिक्षक सचिन कोलगे, लिपिक संदीप कोलगे, सेवक प्रमोद पांचाळ, सेविका श्रीमती गीता खांडके उपस्थित होत्या.



