मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

बिजघरमध्ये शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश

खेड : तालुक्यातील बिजघर गावामध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उबाठा) गटातील शिवसेना शाखाप्रमुख, उपसरपंचांसह अनेक शिवसैनिकांचा रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांच्या माध्यमातून भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “विकसित भारत” या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेवर, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “विकसनशील महाराष्ट्र” या ध्येयावर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कुशल संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून भाजपा नेते तथा खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील बिजघर गावाचे उपसरपंच सखाराम जाधव, शाखाप्रमुख बबन येरुणकर, सीताराम कुदळे, नंदकुमार येरुणकर, बाबू विचारे, उल्पेश पार्ट, शरद मर्चेंडे, श्रीधर मर्चेंडे, पाडुरंग आखाडे, सतीश आखाडे, मानी मोहिते, किरण मर्चेंडे, संतोष कुदळे, संदीप महादळेकर, प्रकाश येरु‌णकर, तुषार कुदळे यांनी भाजपात प्रवेश केला.

यावेळी भाजपा रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, तुषार पवार, मनोज गायकवाड, स्वराज गांधी, अनिकेत पवार, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले यांच्यासह पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!