महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी होणाऱ्या पूर्व परीक्षेची बैठक व्यवस्था

रत्नागिरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट –क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ रविवारी (१ जून) रत्नागिरी तालुक्यात २ उपकेंद्रावर एक सत्रामध्ये सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण ८२५ उमेदवार बसणार आहेत.
परीक्षेची बैठक व्यवस्था अशी आहे : पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी या उपकेंद्रावर बैठक क्र. RT001001 ते RT 001360, तर फाटक हायस्कूल रत्नागिरी येथे RT002001 ते RT002465 अशी बैठक व्यवस्था आहे.
आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा/गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितावर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे. परीक्षांसाठी आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रावर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे.


