एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाचा बँकिंग अँड इन्शुरन्सचा निकाल शंभर टक्के

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस पी हेगशेट्ये महाविद्यालय येथील बँकिंग अँड इन्शुरन्स अभ्यासक्रमाच्या एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परीक्षेत मुजावर इल्का रियाझ शेहनाझ हिने ९.७० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. पाटणकर अरफा नियाज सलीना हिने ९.४५ गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर शिवाळकर रिद्धी राकेश राखी हिने ९.२० गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवळे, विभागप्रमुख प्रा. निशिता पिलणकर, सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



