मुख्य बातमी

जिल्हा पोलिस दलातील २५८ बदल्यांचे आदेश

रत्नागिरी : जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पोलिस दलातील विविध संवर्गातील एकाचवेळी तब्बल २५८ बदल्या केल्या असून, यात १२ जणांच्या जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे.

नुकताच जिल्ह्याचा पोलिस स्वीकारलेल्या पोलिस अधीक्षक बगाटे यांनी आधी खात्यामध्ये सुनियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी जिल्हा पोलिस दलाच्या अस्थापनेवरील सहायक पोलिस फौजदार, पोलिस हवालदार, पोलिस नाईक तसेच पोलिस शिपाई या संवर्गातील सर्वसाधारण बदल्या करण्यात केल्या आहेत. या सर्वसाधारण बदत्यांची कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर आस्थापना मंडळ गठित करण्यात आली होती, ज्याचे अध्यक्ष स्वतः पोलिस अधीक्षक श्री. बगाटे हे होते. तसेच सदस्य म्हणून अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड व प्रभारी पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) श्रीमती राधिका फडके तसेच सदस्य सचिव म्हणून प्रभारी कार्यालय अधीक्षक श्रीमती श्रद्धा तळेकर यांनी काम पहिले.

बदल्या करताना वशिला किंवा सहानुभूती या गोष्टींना बाजूला करत पोलिस अधीक्षकांनी या सहायक पोलिस फौजदार, पोलिस हवालदार, पोलिस नाईक तसेच पोलिस शिपाई या संवर्गातील सर्वसाधारण बदल्या या त्यांच्या समक्ष पारदर्शक तसेच समुपदेशनद्वारे केल्या. यासाठी बदलीस पात्र कर्मचाऱ्यांना बदलीसाठी दिलेल्या पसंती क्रमांचा प्रशासकीयदृष्ट्या विचार करून बदलीबाबत आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार त्वरित प्रभावाने बदली करण्यात आलेली आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदत्त्यांमध्ये प्रशासकीय बदल्यामध्ये सहायक पोलिस फौजदार पदाच्या ३०, पोलिस हवालदार पदाच्या ७२, पोलिस नाईक पदाच्या ४, पोलिस शिपाईपदाच्या ११३ बदल्या करण्यात आल्या. चालक संवर्गातील बदल्यामध्ये पोलीस हवालदार पदाच्या १५, पोलिस नाईक पदाच्या १, पोलिस शिपाई पदाच्या ११ बदल्या करण्यात आल्या. अंतर जिल्हा बदल्यांमध्ये पोलिस हवालदार १, पोलिस नाईक २ आणि पोलिस शिपाई पदाच्या १ जणांच्या बदल्या करण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!