मुख्य बातमी
गावखडीतील श्री स्वामी समर्थ मठात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी श्री स्वामी समर्थ मठात महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त १९ फेब्रुवारी रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी छत्रपतींचे पूजन, दुपारी नैवेद्य अर्पण करून महाआरती होतील. त्यानंतर महाप्रसाद वाटप होईल. सर्व भक्तगणांनी मठामधे उपस्थित राहून या सोहळ्यामधे सहभागी व्हावे आणि श्री स्वामी देवांच्या व छत्रपतींच्या दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



