रत्नागिरी जिल्हा सहकारी मंडळ मर्या. चा रत्नागिरी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध
५ जून रोजी बैठकीचे आयोजन

रत्नागिरी : जिल्हा सहकारी मंडळ मर्या, रत्नागिरी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन 2025-26 ते 2030-31 चा निवडणूक कार्यक्रम प्रसिध्द झाला असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवार निश्चित करणे व नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी गुरुवारी (५ जून) सकाळी ११ वाजता शिवसेना नेते, सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या अभ्युदय नगर (नाचणे) येथील संपर्क बैठक आयोजित करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हास्तरावरील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख, शिवसहकार सेना रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी, शिवसहकार सेना सर्व तालुका संघटक यांनी नियोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख (दक्षिण रत्नागिरी) दत्तात्रय कदम, जिल्हाप्रमुख (उत्तर रत्नागिरी) बाळा खेडेकर, शिवसहकार सेना जिल्हा संघटक रत्नागिरी चंद्रकांत शिंदे यांनी केले आहे.



