मुख्य बातमी

अवैध मद्य वाहतूक करणारा एकजण ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

रत्नागिरी : शहरातील परटवणे ते साळवी स्टॉप जाणाऱ्या मार्गाने रिक्षामधून दारू वाहतूक करत असणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली असून, ८७ हजार रुपयांचे देशी, विदेशी मद्यासह अनिल विष्णू वालकर (वय ३८, रा. मांडवी रत्नागिरी) याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल (२ जून) करण्यात आली.

जिल्ह्यामध्ये अवैध मद्य वाहतूक गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली २ जून रोजी परटवणे ते साळवी स्टॉप जाणाऱ्या मार्गाने काही लोक रिक्षामधून दारू वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती.

मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने परटवणे तिठा येथे दोन पंचांसमवेत वॉच करीत असता एक रिक्षा, पुठ्ठ्याचे बॉक्स भरून घेऊन येत असताना दिसली. ही रिक्षा थांबवून आतील बॉक्सची खात्री केली असता बॉक्समध्ये मद्याच्या बाटल्या असल्याचे दिसून आले, म्हणून या अनिल विष्णू वालकर (वय ३८, रा. मांडवी रत्नागिरी) असे असल्याचे सांगितले.

आरोपी अनिल विष्णू वालकर चालवत असलेल्या रिक्षा मधून वेगवेगळ्या कंपनीची देशी, विदेशी असे एकूण ८७ हजार १२० रुपये किंमतीचे मद्य तसेच १ लाख ५० हजार किंमतीची रिक्षा असा एकूण २ लाख ३७ हजार १२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व अनिल वालकर याला ताब्यात घेण्यात असून मुद्देमाकसावालकर याला पुढील कारवाईसाठी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई पोहेडकॉ शांताराम झोटे, पोहेकॉ बाळू पालकर, पोहेकॉ प्रवीण खांबे, पोहेकॉ गणेश सावंत, मपोहेकॉ वैष्णवी यादव, चा. पोकॉ अतुल कांबळे या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!