मुख्य बातमी

रत्नागिरीत २१, २२ जूनला केबीबीएफची ग्लोबल मीट

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या २१ आणि २२ जून रोजी केबीबीएफची ग्लोबल मीट आयोजित करण्यात आली आहे. विचारांची देवाण घेवाण करत आपले व्यावसायिक विश्व समृद्ध करण्यासाठी आणि आणखी उमेदीने आपला व्यवसाय उद्योग पुढे नेण्यासाठी कऱ्हाडे ब्राह्मण बेनोव्होलंट फाउंडेशन संस्थेने ही ग्लोबल मीट आयोजित केली आहे.

कऱ्हाडे ब्राह्मण ज्ञातीतील उद्योजकांसाठी आयोजित केलेली ही मीट येत्या २१ आणि २२ जून ही रत्नागिरीत टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये होणार आहे. २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजता नोंदणीची प्रक्रिया सुरू होईल. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत “केबीबीएफ काल, आज आणि उद्या” या विषयावरील खुले चर्चासत्र होणार आहे. २२ जून रोजी सकाळी १० वाजता उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मीटचे उद्घाटन होईल. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता

आयफ्लेक्स सोल्युशन्स लिमिटेडचे संचालक दीपक घैसास यांचे “ग्लोबल अस्थिरतेचा व्यावसाईक परिणाम, संधी आणि आव्हाने” या विषयावरील व्याख्यान होईल. त्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत बिझिनेस नेटवर्किंगसंदर्भातील खुले सत्र पार पडणार आहे.

मीटचे नोंदणी शुल्क प्रत्येकी ५०० रुपये, तर स्टॉलसाठी प्रत्येकी ५०० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. मीटकरिता नोंदणी करण्याचे आवाहन केबीबीएफच्या रत्नागिरी विभागाचे अध्यक्ष सुहास ठाकूरदेसाई (9822290859), कोषाध्यक्ष ॲड. गौरव महाजनी (8380069320) आणि सचिव गीता भागवत (8275433735) यांनी केले आहे.

नोंदणीसाठी लिंक अशी -https://kbbfglobal.org/eventDetails.aspx?nid=10048

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!