आरोग्यमुख्य बातमी

रत्नागिरी जिल्ह्याच्या लसीककरण सनियंत्रकांची उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरी : जिल्ह्याच्या लसीकरण सनियंत्रकांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तिन्ही लसीकरण सनियंत्रकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

१० ते २० जून २०२४ या कालावधीत संपूर्ण राज्यात संचालक, आरोग्य सेवा, पुणे तसेच आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली इम्युनायझेशन कव्हरेज स्टडी (Immunization Coverage Study) राबविण्यात आली. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील लसीकरण सनियंत्रक तुषार साळवी, बालाजी राठोड व श्वेता सावंत यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्राथमिक व उपजिल्हा आरोग्य संस्थांना भेटी दिल्या. त्यांनी तेथील कार्यक्षेत्रातील ० ते ५ वर्षे वयोगटातील नियमित लसीकरण लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करून लसीकरणाच्या अंमलबजावणीचा अभ्यास केला. हा पडताळणी अहवाल कोल्हापूरच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला.

या कामकाजासाठी रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तत्कालीन जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. पल्लवी पगडाळ, SMO डॉ. खैरनारे, तसेच पीएचएन श्वेता तारये व प्रिया पेडणेकर, कौस्तुभ भाटकर, नीलेश विचारे व अभिजीत कांबळे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!