मुख्य बातमी
आडिवरे येथे पावसामुळे झालेल्या नुकसानीची भाजप पदाधिकाऱ्यांकडून पाहणी

राजापूर : येथील महाकाली मंदिर आडिवरे परिसरात भरलेल्या पावसाच्या पाण्याची आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह भाजपा पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी तेथील प्रशासकीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार यांच्या भेटी घेऊन तेथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच संबंधितांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे सादर करावे, अशा सूचना दिल्या.


यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह प्रदेश पदाधिकारी शिल्पा मराठे, जिल्हा सरचिटणीस अमित केतकर, बाळ दाते, वसंत पाटील, धनंजय मराठे, मंदार खंडकर, राजेंद्र फाळके, समीर सावंत तेथील स्थानिक ग्रामस्थ भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्थानिक सरपंच यांच्यासह आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




