काँग्रेसचे गुहागर तालुकाध्यक्ष गजानन जाधव यांचा मनसेतर्फे सत्कार

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील मळण गावचे सुपूत्र, प्रेस क्लब गुहागरचे सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार आणि गुहागर तालुका काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष गजानन जाधव यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) तालुका गुहागर पक्षाच्या वतीने शृंगारतळी येथील मनसे संपर्क कार्यालयात उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका सचिव प्रशांत साठले, उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष प्रथमेश रायकर, गुहागर शहराध्यक्ष अभिजीत रायकर, शेतकरी संघटना अध्यक्ष प्रसाद कुष्ठे यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव यांनी केले.



