मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाशैक्षणिक

टेरव येथे शालेय विद्यार्थ्यांच्या स्वागताचा आनंद सोहळा

चिपळूण : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा टेरव नंबर एक (ता. चिपळूण) या शाळेत इयत्ता पहिली प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या दिमाखात आनंदात साजरा करण्यात आला. प्रारंभी विद्यार्थ्यांना वाजत गाजत सर्व माता पालक ग्रामस्थ यांच्या समवेत आणण्यात आले. सुदेश साळवी यांच्या संकल्पनेतून फुलांच्या गालिचा वरून मुलांचे आगमन झाले. यावेळी त्यांच्या शाळेचे पहिले पाऊल कागदावर उमटवण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. सर्व मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. मोफत गणवेश वाटप करण्यात आला.

या कार्यक्रमाला टेरवचे सरपंच किशोर कदम, उपसरपंच रिया म्हालिम, सुदेश साळवी, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष रश्मी काणेकर, ग्रामपंचायत सदस्य मानसी कदम, मानसी मेंगे, साक्षी पालकर, मेंगे ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मानसी कदम यांनी आपले विचार व्यक्त केले आणि नवागातांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक श्री. मोने यांनी शैक्षणिक आढावा घेतला व शालेय गरजा सर्वांसमोर ठेवून त्या पूर्ण करण्यासाठी मागणी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पवार केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहा चिपळूणकर, निशिगंधा कांबळे, स्नेहल गायकवाड, तनुजा मोहिते यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता खाऊ वाटप होऊन आभार श्री. सन्मुख यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!