शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी चिराग घाग याची विस्तार अधिकारी पदी नियुक्ती

आबलोली (संदेश कदम) : खरवते-दहिवली (ता. चिपळूण) येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी चिराग रमेश घाग याची जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या नियुक्ती प्रक्रियेमध्ये पंचायत समिती, गुहागर येथील सांख्यिकी विभागात नुकतीच नियुक्ती झाली.
चिराग घाग हा शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयामधील उत्तीर्ण विद्यार्थी आहे. त्याच्या या दैदीप्यमान यशाबद्दल चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी चिराग यांचे विशेष अभिनंदन केले व त्याला त्याच्या भविष्यातील प्रशासकीय कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारीवर्गातून चिराग याचे अभिनंदन व कौतुक होत आहे.



