मुख्य बातमी

समृद्ध पंचायतराज अभियानात गावखडी ग्रामपंचायतीचा उत्स्फूर्त सहभाग 

गावखडी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावखडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा उत्साहात झाली. या ग्रामसभेला महिला, ग्रामस्थ मिळून सुमारे १५० जणांनी उपस्थित लावली.

ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच गौतम पाटील, ग्रामसेवक सानिका शिंदे, उपसरपंच मुरलीधर तोडणकर, ग्रा.प.सदस्य स्मिता भिवंदे, पोलीस पाटील सौ. साक्षी मुडे, पोलीस पाटील, दिनेश बिजै, तलाठी सचिन शेवाळे, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, बचत गट महिला, ग्रामपंचायत कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृष्टी व्हिडिओ काॅन्फरन्सव्दारे ग्रामसभेला मार्गदर्शन केले.आपल्या मनोगतात त्यानी नमूद केले कि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या च्या ७५ व्या वाढदिवसाच्या औचित्याने महाराष्ट्र शासनाने “समृध्द पंचायतराज अभियान “राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत पुढील शंभर दिवस ग्रामपंचायतींनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून लोकसहभागातून पंचायतराज व्यवस्था सक्षम करावी.

सभेनंतर सरपंच गौतम पाटील यांनी ग्रामस्थांना आवाहन केले की, ३० सप्टेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यात घरपट्टी १०० टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट ग्रामपंचायतीने ठेवले आहे. गावकऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून गावखडी राज्यात आदर्श ठरवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामस्थांनी या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरपट्टी भरण्याचे आश्‍वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!