मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

चिपळूणच्या वाशिष्ठी मिल्क प्रॉडक्ट प्रकल्पाला पालकमंत्री उदय सामंत यांची भेट 

चिपळूण : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (२७ जून) चिपळूण येथील प्रशांत यादव यांच्या वाशिष्ठी मिल्क प्रॉडक्ट या प्रकल्पाला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली व प्रकल्पाची पाहणी केली.

“हा प्रकल्प केवळ स्थानिक नव्हे, तर संपूर्ण कोकणासाठी अभिमानास्पद आहे. अल्प कालावधीत येथे ६७ पेक्षा अधिक दुग्धजन्य उत्पादने तयार केली जात आहेत ही खरोखर गौरवास्पद बाब आहे. रत्नागिरीत मिल्क कलेक्शन कल्चर अद्याप रुजलेले नाही, यावर सकारात्मक चर्चा झाली. हे कल्चर कोकणातही रुजावे, अशी आपली इच्छा आहे. पश्चिम महाराष्ट्राशी स्पर्धा करू शकणारा असा हा प्रकल्प आहे, असे यावेळी पालकमंत्री सामंत यांनी म्हटले.

 

यावेळी सामंत यांनी रत्नागिरी शहरात वाशिष्ठी प्रॉडक्टचे एजन्सी सुरू करण्याचे निमंत्रण दिले. विशेष म्हणजे महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रत्नागिरी एसटी. स्टँड परिसरात देखील शाखा सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सामंत सांगितले.

उद्योग, स्थानिक रोजगार आणि कोकणातील प्रगती यासाठी अशा प्रकल्पांचे मोठं योगदान असून, अशा प्रयत्नांना नेहमीच पाठिंबा राहील, असे पालकमंत्री सामंत यांनी आश्वस्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!