लायन्स क्लब रत्नागिरीच्या अध्यक्षपदावर संजय पटवर्धन यांची निवड

रत्नागिरी : लायन्स क्लब रत्नागिरीची २०२५-२६ ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष ला. संजय पटवर्धन, सचिव ला. शरद नागवेकर, खजिनदार ला. मनोज सावंत यांची निवड करण्यात आली.

लायन संजय पटवर्धन हे गेली पंचवीस वर्ष फूड इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत असून माळनाका येथे त्यांचे पटवर्धन फूड्स हे स्वीट्स आणि नमकीन पदार्थांचे आऊटलेट आहे. प्रचंड जनसंपर्क आणि समाजसेवेची आवड असणाऱ्या संजय पटवर्धन यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सचिव ला. शरद नागवेकर हे बीएसएनएलचे सेवानिवृत्त अधिकारी असून लायन्स क्लबच्या सेवाकार्यात नेहमी हीरीरीने सहभाग घेतात. नियुक्त खजिनदार ला. मनोज सावंत विमा आणि गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्याही मोठ्या जनसंपर्काचा फायदा लायन्स क्लबला होणार आहे.

या तिघांबरोबरच लायन्स क्लब मच्या संपूर्ण कार्यकारिणी मंडळाचा शपथवीधी ५ जुलै रोजी माजी प्रांतपाल ला. सुनील सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.




