मुख्य बातमी

अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे पावसाच्या कवितांचे आयोजन

रत्नागिरी : अखिल भारतीय साहित्य परिषद रत्नागिरी शाखा यांच्यातर्फे कालिदास जयंतीनिमित्त २८ जून रोजी ‘पावसाच्या कविता’ या विषयावर कविता वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये सायंकाळच्या या वेळेत संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजिका प्रा. डॉ. चित्रा मिलिंद गोस्वामी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व त्यांची लिखित पुस्तके मान्यवरांना स्वागतसमयी देण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतील अनिल दांडेकर यांनी भूषविले. “लेखकाने आत्मपरीक्षण करणे महत्त्वाचे आहे”, हे आपल्या मनोगतातून ते म्हणाले.

या कार्यक्रमासाठी अनेक कवींनी आपला सहभाग नोंदविला. ज्यामध्ये प्रा. डॉ. चित्रा मिलिंद गोस्वामी (धो- धो पावसात भिजू दे),सेजल मेस्त्री (नाते दोन जीवांचे), मेधा मिलिंद कोल्हटकर (पानी), ज्ञानेश्वर कृष्णा पाटील (सप्तरंगी श्रावण), डॉ. मंगल पटवर्धन (श्रावण पाऊस), सचिन सनगरे (पाऊस ज्याचा त्याचा), सचिन सदानंद काळे (शेतकऱ्याचा पाऊस), प्रा. दत्तात्रय कांबळे (ती, मी आणि पाऊस), श्रेया जयसिंग लोहार (पावसातील नभ), मानवी सुनील होरंबे (पाऊस), उमेश नामदेव मोहिते (पाऊस), मानसी प्रसाद गानू (बहर सृष्टीचा), सायली बारगोडे (सुन बारिश कैसे शुक्रिया करू?), वसुंधरा जाधव (भिजते क्षण), सुनेत्रा विजय जोशी (सृजनाचे गाणे), उमा जोशी (आला पाऊस भरून), फाईजा सरफराज सय्यद (बरसात : कमाल भी, निराश भी), अदिबा अशरफ नाकाडे ( बरसात कुछ कह गयी), विस्मया कुलकर्णी (झाले साक्षीदार मी) या सर्व कवींनी कविता सादरीकरण केले. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अनेक कवि रसिकांनी उपस्थिती दर्शवली.

संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण राजदीप कदम आणि विनायक गावडे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेजल मेस्त्री व आभार प्रदर्शन प्रा. सचिन सनगरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!