जि .प. शाळा पूर्णगड नं. १ शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी व वारी पर्यावरणाची उपक्रम

रत्नागिरी : तालुक्यातील जि. प. शाळा पूर्णगड नं. १ शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी व वारी पर्यावरणाची या उपक्रमांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. सुरुवातीला वृक्षदिंडी, पर्यावरण जागृती घोषणा, वृक्षारोपण या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तद्नंतर आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी यांचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थी शिक्षक विठू नामाच्या गजरात तल्लीन झाले.

यावेळी विद्यार्थ्यांनी केलेली वारकरी वेशभूषा विशेष आकर्षण ठरली. शाळेच्या या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षकवृंद पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या समाज जागृतीच्या उपक्रमाविषयी परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे. शाळेच्या या उपक्रमाविषयी केंद्रप्रमुख संजय राणे यांनी विशेष कौतुक केले आहे.



