जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे ठाणे येथे हॉस्पिटलना बेंच, दिव्यांगांना व्हीलचेअर्सचे वाटप

ठाणे : जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रदाचार्य महाराज यांच्या सिद्धपादुकांचा दर्शन सोहळा शुक्रवारी ठाणे येथील गावदेवी मैदान येथे झाला. यावेळी संस्थानच्या सेवाभावी उपक्रमांतर्गत १३ बेंच व २ व्हीलचेअरचे वितरण करण्यात आले.
सुरुवातीला सिद्ध पादुकांचे ठाण्यात आगमन झाले. याप्रसंगी पादुकांची वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होते. दर्शन सोहळा अतिशय उत्सवात झाला.

जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत ठाणे स्टेशन येथे ८ बेंच अपंगांसाठी दोन व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. तसेच ठाणे येथील शिवाजी हॉस्पिटल येथे रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी ५ बेंच असे एकूण १३ बेंच व दिव्यांग प्रवाशांसाठी २ व्हीलचेअरचे विनामूल्य वाटप मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी स्वरूप संप्रदायाचे पदाधिकारी तसेच हजारो भाविक उपस्थित होते.



