गुहागर मनसेच्या वतीने राज ठाकरे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

आबलोली (संदेश कदम) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष हिंदूहृदयसम्राट राज ठाकरे यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मनसे विधानसभा क्षेत्र गुहागरच्या वतीने आणि मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर येथील श्री व्याडेश्वर मंदिर येथे अभिषेक करण्यात आला. तसेच राज साहेबांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त पालपेणे येथे ५७ काजू झाडांची लागवड करण्यात आली. लागवड केलेला सर्व वृक्षांची संगोपन व वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी मनसेने घेतली आहे.
यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, सहसंपर्क अध्यक्ष समीर जोयशी, गुहागर तालुका सचिव प्रशांत साटले, गुहागर शहराध्यक्ष अभिजीत रायकर, गुहागर तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रथमेश रायकर, उपतालुका अध्यक्ष अमित खांडेकर, गुहागर तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष प्रसाद कुष्टे, गुहागर शहर संघटक नंदकुमार जांगळी, वॉर्ड अध्यक्ष दत्ताराम गिजे, आबलोली शहराध्यक्ष सुमित पवार, कौंढर काळसुर शाखाध्यक्ष सुनील मूकनाक, गुहागर शहर शाखाध्यक्ष गणेश गिजे, महाराष्ट्र सैनिक साहिल कदम, गुहागर उपशहर अध्यक्ष राजा कदम, पाटपन्हाळे शाखाध्यक्ष सुयोग कुंबेटे, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव, अवनी खांडेकर, सरिता खांडेकर, स्वरा खांडेकर, समीक्षा घाणेकर, अस्मिता घाणेकर, दर्शना गायकर तसेच गावातील महिला व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विनोद जानवळकर यांनी राजसाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी मनोगत व्यक्त केले. मनसैनिकांकडून दिवसभरात फळ वृक्षलागवड, गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आदी समाजोपयोगी उपक्रम घेण्यात आले. राहुल जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.



