मुख्य बातमी
निवृत्तीवेतन धारकांसाठी १२ ऑगस्ट रोजी मेळावा

रत्नागिरी : जिल्हा कोषागार अधिकारी यांनी जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारकांसाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजता या वेळेत श्री शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद, रत्नागिरी येथे होणार आहे. मेळाव्यात निवृत्तीवेतनधारकांना देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतन व इतर लाभांसंबंधी चर्चा करण्यात येणार आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी तसेच बँक व्यवस्थापक/प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले आहे.


