मुख्य बातमी

गौरांग आगाशे यांच्याकडून बसणी शाळेला संगणक भेट 

रत्नागिरी : येथील अनबॉक्स युअर डिझायरचे गौरांग आगाशे यांच्याकडून तालुक्यातील बसणी येथील जी. एम. शेट्ये हायस्कूलला दोन संगणक भेट देण्यात आले.

जी. एम. शेट्ये हायस्कूल बसणी शाळेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष ॲड. अविनाश ऊर्फ भाऊ शेट्ये, शाळेचे पदाधिकारी बापू गवाणकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. नाईक, श्रीमती पंडीत, जाधव उपस्थित होते.

यावेळी युवा उद्योजक गौरांग आगाशे यांनी शाळेला ज्यावेळी जी काही मदत लागेल ती मी नक्की करेन, तसेच आता दिलेल्या संगणकांची देखभाल देखील मी करणार आहे, असे आश्वासन दिले.

दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष भाऊ शेट्ये, बापू गवाणकर यांच्यासह इतर पदाधिकारी, शाळेचे शिक्षक हे शाळेतील मुलांसाठी खूप मेहनत घेतात. मुलांना आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य देणगी गोळा करून उपलब्ध करून देत असून, स्नेहसंमेलन आणि अल्पोपहारही समाजातील दानशूर व्यक्तींकडून दिले जाते. सध्या सर्वच पालक आपल्या मुलांना शहरातील शाळांमध्ये घालत असले तरीही आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या मुलांचे शिक्षण केवळ पैसे नाहीत म्हणून थांबता कामा नये अशा उदात्त हेतूने बिकट परिस्थिती असूनही ही शाळा आर्थिकदृष्ट्या मागास मुलांसाठी चालू ठेवल्याचे भाऊ शेट्ये यांनी सांगितले. शाळेतील शिक्षकही मुलांना अतिशय चांगले शिक्षण देत असून, शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागत आहे. तसेच मुलेही ९० टक्के गुण मिळवत असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!