शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केलेल्या पटवर्धन हायस्कूलच्या तब्बल ३९ विद्यार्थ्यांचा सत्कार
राज्य गुणवत्ता यादीत पटवर्धन हायस्कूलचे चार विद्यार्थी

रत्नागिरी : शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा व आठवी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत पटवर्धन हायस्कूलने उत्तुंग यश प्राप्त केले आहे. शिष्यवृत्ती व एनएमएमएस परीक्षेत एकूण ३९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. या गुणवंत यशप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज (२६ जुलै) रोजी पार पडला. गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे भारत शिक्षण मंडळामार्फत सत्कार करण्यात आला.
पटवर्धन शाळेच्या इयत्ता आठवीच्या १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले असून, यापैकी चार विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत झेप घेतली आहे. ही शाळेसाठी आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांचे शाळेच्या संस्था पदाधिकाऱ्यांनी, मुख्याध्यापकांनी आणि पर्यवेक्षकांनी भरभरून कौतुक केले. पटवर्धन शाळेने शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांनी विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे, शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या सहकार्याचे कौतुक केले. प्रास्ताविकानंतर प्रमुख पाहुण्याचा परिचय श्रीमती केळकर यांनी करून दिला. आजच्या सत्कार समारंभास उपस्थित संस्था पदाधिकारी श्रीराम भावे, विनायक हातखंबकर, भारत शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा श्रीमती नमिता कीर, संस्था पदाधिकारी व क्रेडाईचे अध्यक्ष नित्यानंद भुते व रत्नागिरीतील प्रसिद्ध बिल्डर के. एस. पवार व पालक प्रतिनिधी श्री. आठले तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. सुनील कीर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षिका श्रीमती शिरोळकर, पर्यवेक्षक श्री. लवंदे व उपमुख्याध्यापक श्री. पंगेरकर यांनीही मुलांचे कौतुक केले.

आजच्या विद्यार्थी सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार मनोज मुळ्ये यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात त्यांनी यश प्राप्तीसाठी मेहनतीशिवाय पर्याय नाही. तसेच यश प्राप्तीसाठी योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता असते ते तुम्हाला प्राप्त झाले आहेत, असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्रीमती नमिता कीर यांनी विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले यश व शिक्षकांची मेहनतीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कौस्तुभ पालकर यांनी केले. या गुणवंत विद्यार्थ्यांमुळे पटवर्धन शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
आठवी शिष्यवृत्ती गुणवंत यादी : फणसे नित्या संदीप (राज्यात तिसरी जिल्ह्यात शहरी गुणवत्ता यादी प्रथम 96.00 टक्के), दामले आदित्य महेश (राज्यात सहावा, शहरी गुणवत्ता यादी द्वितीय 94.6667 टक्के), डोळ ललित अनंत (राज्यात बारावा, शहरी गुणवत्ता यादीत तृतीय .92.00 टक्के), पाटील मधुरा संजय (राज्यात सोळावा, शहरी गुणवत्ता यादीमध्ये चतुर्थ क्रमांक 90.6667 टक्के), तसेच कुमारी शेडेकर श्रावणी तेजस (जिल्ह्यात 29 वी 78.6667 टक्के), भाटकर सिद्धी शैलेश (जिल्ह्यात 40 वी 75.3333 टक्के), साळुंखे स्वराज दीपक (जिल्ह्यात 51 वा 73.3333 टक्के), शेलार आदिती विनोद (जिल्ह्यात 60 वी 72.00 टक्के), काळे आश्लेषा रमेश (जिल्ह्यात 61वी 71.3333 टक्के), रायकर अंतरा अमेय, (जिल्ह्यात 70 वी 70.6667 टक्के), सूर्यवंशी मैत्री महेश (जिल्ह्यात 72 वी 70.6667 टक्के), नाटेकर आर्ची सुदेश (जिल्ह्यात 87 वी 68.67 टक्के), मयेकर यज्ञा वीरेंद्र (जिल्ह्यात 91वी 68.00 टक्के) या विद्यार्थ्यांनीही शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती मिळवली आहे.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना मराठीसाठी श्री. पालकर, श्रीमती केळकर, गणितासाठी श्रीमती दामले व श्रीमती बंडबे श्री. वावरे, इंग्रजीसाठी श्रीमती डोंगरे, बुद्धिमत्तेसाठी श्रीमती पिलणकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
इयत्ता पाचवी स्कॉलरशिप : आभा अमित घारपुरे (जिल्हा गुणवत्ता यादीत 7 वी), आराध्य संदीप फणसे (29 वा), अर्णव सुभाष मरगळे (51वा), दूर्वा संतोष चव्हाण (13 वी), गिरीश अतुल जाधव (42 वा), हर्ष राजेंद्र सपकाळ (88 वा), इंद्रनील सचिन आठल्ये (17 वा), ईशान साईनाथ नेवरेकर (72 वा), सानवी विवेक झगडे (66 वी), श्लोक अविनाश धुमाळे (50 वा), त्रिशा सचिन नेवरेकर (81 वी), उन्नती उपेंद्र बंदरकर (103 वी), स्वराली उमेश टापरे (71 वी), वल्लरी विनायक मुकादम (99 वी), वरद माणिक भोये (79 वा), वीणा अरुण बंडबे (77 वी). पाचवी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना मराठी विषयासाठी श्रीमती ताडे, श्रीमती हर्डीकर, श्रीमती पवार, गणित विषयासाठी श्री. कनोज, श्रीमती शिर्के, इंग्रजी विषयासाठी श्री. भोये, श्रीमती काटकर, बुद्धिमत्ता विषयासाठी श्रीमती शेट्ये, श्रीमती गुरव यांनी मार्गदर्शन केले.
एनएमएमएस शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी : शेडेकर श्रावणी तेजस (जिल्ह्यामधून खुल्या गटातून 14 वा क्रमांक), गोरीवले तीर्था शशिकांत (जिल्ह्यामधून ओबीसी गटातून 31 वा क्रमांक), अल्लोळकर सानिका रुक्मान्ना (जिल्ह्यामधून खुल्या गटातून 34 वा क्रमांक), पानवलकर अर्णव अंकुश (जिल्ह्यामधून खुल्या गटातून 49 वा क्रमांक), सूर्यवंशी मैत्री महेश (जिल्ह्यामधून खुल्या गटातून 57 वा क्रमांक), तोडणकर हर्षा दिवाकर (जिल्ह्यामधून खुल्या गटातून 62 वा क्रमांक).
सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी : देसाई तन्मय संतोष, सुर्वे श्रेयसी देवेश, जाधव अरुंधती इंद्रनील, सावंत पुष्पराज संजय.
एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना उमेश दिवटे, कौस्तुभ पालकर, ओंकार वैद्य, श्रीमती मीरा दामले, श्रीमती श्रद्धा पिलणकर आणि प्रशांत वावरे यांचे मार्गदर्शन लाभले.


