मुख्य बातमी
जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक शुक्रवारी

रत्नागिरी : पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (२७ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय येथे माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ज्या माजी सैनिकांना कौटुंबिक संरक्षण संदर्भात तक्रारी असल्यास बैठकीत आपला अर्ज व संबंधित कागदपत्रासह विहीत वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

