रत्नागिरी नगरपालिका शाळा क्र. १९ आंबेशेत शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

रत्नागिरी : श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर रत्नागिरी नगरपालिका शाळा क्र. १९ आंबेशेत शाळेतील विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत विद्यार्थी झळकले आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेत श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर आंबेशेत शाळेतील इयत्ता पाचवीतील स्वरा महादेव गुरव हिने जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत १८ वा क्रमांक, तर इयत्ता चौथीतील विद्यार्थी सार्थक निलेश वाडेकर याने जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत ९७ वा क्रमांक आला आहे. इयत्ता चौथीतील नील रितेश सावंत याने जिल्हा गुणवत्ता यादीत १०५ वा क्रमांकाचे स्थान मिळविले आहे.
रत्नागिरी नगरपालिका शाळा क्रमांक १९ आंबेशेत या शाळेतील विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संचिता सचिन भाटकर आणि सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, पालक यांच्या वतीने
गुणवंत विद्यार्थ्यांसह शाळेचे मुख्याध्यापक नागेंद्र कणमुसे, शिक्षक विनय कांबळे, शिक्षिका वर्षा म्हादे आदी शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.


