मुख्य बातमी

रत्नागिरी नगरपालिका शाळा क्र. १९ आंबेशेत शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

रत्नागिरी : श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर रत्नागिरी नगरपालिका शाळा क्रमांक १९ आंबेशेत शाळेतील विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत विद्यार्थी झळकले आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेत श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर रत्नागिरी नगरपालिका शाळा क्रमांक १९ आंबेशेत शाळेतील इयत्ता चौथीतील नील रितेश सावंत आणि सार्थक निलेश वाडेकर स्कॉलरशिप परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत आले आहेत. इयत्ता पाचवीतील स्वरा महादेव गुरव स्कॉलरशिप परीक्षेत रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.

रत्नागिरी नगरपालिका शाळा क्रमांक १९ आंबेशेत या शाळेतील स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवत्ता यादीत या विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे मुख्याध्यापक नागेंद्र कणमुसे, शिक्षक विनय कांबळे, शिक्षिका वर्षा म्हादे आदी शिक्षक वृंदांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. संचिता सचिन भाटकर आणि सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, पालक यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!