मुख्य बातमी
मिरकरवाडा परिसरात तरुणाचा खून

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा खडकमोहल्ला परिसरात सुतारकाम करणाऱ्या कामगाराचा निर्घृण खून केल्याची घटना आज (२ ऑगस्ट) सायंकाळी समोर आली आहे. सोबत असलेल्या साथीदाराबरोबर झालेल्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
तरुणाला भोसकून ठार करण्यात आले आहे. खून झालेला कामगार आणि त्याचा साथीदार हा परप्रांतीय असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील हे आपल्या टीम सह दाखल झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मिरकरवाडा येथे मोठा जमाव गोळा झाला होता. दरम्यान, खून केलेल्या तरुणाला त्याला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आहे.



