मुख्य बातमी

नारळी पौर्णिमानिमित्त शुक्रवारी स्थानिक सुट्टी

रत्नागिरी : जिल्ह्यातील महसूल हद्दीमधील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त ३ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी ८ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

त्याबरोबरच ज्येष्ठा गौरी विसर्जन निमित्ताने २ सप्टेंबर रोजी आणि नरक चतुर्दशी (अभ्यंगस्थान) निमित्ताने २० ऑक्टोबर रोजी देखील स्थानिक सुट्ट्यांचे दिवस म्हणून रत्नागिरी जिल्हा महसूल हद्दीसाठी जाहीर केले आहेत. याबाबत सन २०२५ साठी स्थानिक सुट्ट्यांची अधिसूचना ७ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!